नाशिक – प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून सोशल डिस्टींक्शनचे सर्व नियम पाळत देव द्या, देवपण घ्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून “देव द्या देवपण घ्या” या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी विद्याथी कृती समितीच्या वतीने मोफत फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझर देण्यात आले.
गोदावरीचे प्रदूषण रोकण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवातील प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात असे आवाहनही विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी यावेळी केले. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.