देवळा : तालुक्यातील पिंपळगाव वाखारी येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असून आज काही तासाच्या अंतराने कोरोनाबधित पती आणि पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी कोरोना बाधित झालेले पांडुरंग विठ्ठल आहेर (वय ७५) व त्यांच्या पत्नी किसनाबाई पांडुरंग आहेर (वय ६५) हे उपचार घेऊन घरी परतले होते. मात्र बुधवार ( दि. ७ ) रोजी पहाटे २:३० वाजेच्या सुमारास पांडुरंग आहेर यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी चालू असतांनाच सकाळी ११:१५ वाजता पत्नी किसनाबाई आहेर यांचेही निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.