शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देवळा – सुनील आहेर मार्केटचा परवाना रद्द, पणन संचालकांचे आदेश

by Gautam Sancheti
मार्च 26, 2021 | 1:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210326 WA0034 e1616765461673

देवळा :  सुनिल आहेर कृषि मार्केट यार्ड प्रा.लि. देवळा, या थेट पणन परवाना धारकाने खाजगी बाजार स्थापन केला असल्याचे भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश पणन संचालक सतीश सोनी यांनी दिले आहेत. याबाबत देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव माणिक निकम यांनी तक्रार दाखल केली होती.
शेतकऱ्यांकडील कृषि मालाची खरेदी केंद्रावर थेट खरेदी करणे आपेक्षित असताना जाहीर लिलावाव्दारे कृषि मालाची खरेदी केली. याप्रकरणी सदर थेट पणन परवाना धारकाचे नावामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याने तसेच खाजगी बाजार चालू केल्याचा संभ्रम निर्माण होत असल्याने सदर परवाना धारकाच्या नावावर सचिव, देवळा कृषि उत्पन्न बाजार समिती, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक यांनी आक्षेप घेतला होता. प्रतिवादी यांचे वतीने  सुनिल आहेर यांनी सदर आक्षेप मान्य करुन त्यांच्या थेट पणन परवान्यातील नावामध्ये बदल करणेबाबतचा अर्ज सादर करणार असल्याचे सुनावणी दरम्यान सांगितले. याप्रमाणे अर्जदार यांच्या नावाबाबतच्या आक्षेपास अनुसरुन प्रतिवादी हे नविन नावाने थेट पणन परवान्यासाठी अर्ज सादर करण्यास पात्र राहतील. सबब, प्रतिवादी यांना प्रदान केलेला थेट पणन परवाना रद्द करणे क्रमप्राप्त असल्याचे पणन संचालक सोनी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

…..

फक्त खरेदी केंद्राचे नावात बदल करण्यात येईल
कामकाज कुठेही थांबणार नाही
सुनिल आहेर कृषी मार्केट यार्ड प्रा.लि. च्या कामकाजाबाबत केलेल्या तक्रारीवर सुनावणी आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये मा.पणन संचालक साहेबांनी परवान्यात असलेले ‘मार्केट यार्ड’ हे नाव वगळून नावात बदल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही नावात बदल करण्यासाठी पत्र दिलेले असुन.संपूर्ण प्रस्ताव लवकरात लवकर सादर करणार आहोत.सुनिल आहेर कृषी मार्केट यार्ड प्रा. लि. कंपनीचे कामकाज कुठेही थांबणार नाही यामध्ये फक्त खरेदी केंद्राचे नावात बदल करण्यात येईल.व शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही सदैव तत्पर राहु.
  -सुनिल आहेर (संचालक- सुनिल आहेर कृषी मार्केट यार्ड प्रा.लि.)
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सुरू

Next Post

सिन्नर – केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे उपोषण, धोरणावर केली टीका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210326 WA0035 e1616766483281

सिन्नर - केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे उपोषण, धोरणावर केली टीका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011