देवळा : बनावट मुद्रांक बनवून खोटे दस्त तयार करून झालेल्या शेतजमीन खरेदी प्रकरणात आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली.
देवळा दुय्यम निबंधक कार्यालयात कंत्राटी पदावर संगणक चालक म्हणून काम करत असलेल्या आबा पवार या व्यक्तीवर या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे देवळा पोलिसांना मिळाल्याने त्याला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात कलम ४२०,४०६,४६७,४६८,४७१,३४ अशा विविध कलमाद्वारे देवळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये ८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.याबाबत पुढील तपास देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख करत आहेत.
तसेच मुख्यसूत्रधार चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याला काल कळवण न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.