देवळा – तालुक्यातील मेशी व परिसरात शनिवार ( दि. २०) रोजी दुपारी झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपिटीने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून वीज पडून बकरी ठार झाली.
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण झाले असून शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाबरोबरच गारपीट झाल्याने शेतात काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरे तसेच आंब्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक झालेल्या गारपिटीने व पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
वीज पडून शेळी ठार
मेशी फाटा येथील बापू भिका शिंदे यांच्या घराशेजार असलेल्या शेळ्यांच्या शेडवर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडल्याने एक शेळी ठार झाली.सुदैवाने उर्वरित शेळ्या थोड्या अंतरावर असल्याने अनर्थ टळला.