देवळाली कॅम्प – गेल्या काही दिवसांपासून देवळाली शहरातील आठही वॉर्डात कोरोना बांधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ३ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे आठवी वॉर्डमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून ही संख्या पुन्हा ६९ इतकी झाली आहे. दिवाळीनंतर शहरात दाखल झालेले पर्यटक व नागरिकांचे शहरात विनामास्क फिरणे यासारखी वेगवेगळी कारणे या वाढीला कारणीभूत ठरली आहे. कोरोनाबाधित रुग्णही फिरत असल्याच्या तक्रारी सुध्दा आहे.गेल्या चार दिवसात येथील डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर असलेल्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये सुमारे १३३ हून अधिक नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली. यापैकी तपासणी नंतरप्राप्त झालेल्या अहवालात सुमारे ४८ इतकी संख्येत भर पडली आहे. अद्यापही काही अहवाल येणे प्रलंबित आहे.काल सकाळपर्यंत शहरात तब्बल ६९ रुग्ण बाधित असून त्यापैकी २६ घरीच क्वारंटाईन झाले असून उर्वरित उपचार घेत आहे.