नाशिक – शालेय जीवनात अभ्यासाबरोबर मुलांमध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा वापर हा समाजकार्यासाठी व्हावा या उद्देशाने देवळाली कॅम्पमध्ये रोटरी क्लबकडून १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी इंटरॲक्ट क्लबची स्थापना आली आहे.
हायस्कूल येथे १२ ते १८ वयोगटासाठी देवळाली हायस्कुलमध्ये इन्स्टिट्यूशन क्लबची स्थापना करतांना अध्यक्षपदी श्रेया मोजाड तर सचिव पदी वरूण पहुजा तर कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कुल, आदर्श शिशु विहार,केंद्रीय विद्यालय व सेंट पॅट्रिक्स शाळेतील मुलांच्या कम्युनिटी क्लबच्या अध्यक्षपदी शिखा त्रिपाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची ऑनलाईन घोषणा इंटरॲक्ट क्लबचे डिस्ट्रिक चेअरमन वीरेंद्र पत्रीकर यांनी केली. यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, विद्यार्थ्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर हा समाज हितासाठी व्हावा याकरिता आपण या क्लबची निर्मिती करत असतो. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मुरली राघवन यांनी प्रास्ताविकातून सांगितले शिक्षणाबरोबर
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सामाजिक आत्मभान राखून, बाहेरच्या जगाची ओळख करून घेत आपला व्यक्तिमत्व विकास साधणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी या इंटरॲक्ट क्लब कार्य करीत असते.या क्लबच्या निर्मितीसाठी रोटरी युथ सर्व्हिसेसचे चेअरमन ऍड अशोक आडके, संध्या सुंदरामन,कमलेश वर्मा यांच्या विशेष प्रयत्नाने या क्लबची निर्मिती करण्यात आली आहे. या क्लबच्या शुभारंभप्रसंगी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.