देवळाली कॅम्प – संसारी नाका येथील देवळाली प्लाझा या निवासी संकुल व व्यापारी संकुलाचा सात वर्षांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न अखेर नगरसेवक भगवान कटारिया यांनी मार्गी लावला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. देवळाली प्लाझा मधील पाच इमारतील रहिवासी व गाळे धारकांना कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पाणी पुरवठा काही तांत्रीक अडचणी मूळे होत नव्हता. नगरसेवक कटारिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याकडे वारंवार विनंती केल्या नंतर मुख्य जलवाहिनीतून स्वतंत्र पाणी पुरवठा करत ४ इंच सुमारे साडेबारा लाखाची पाणी वाहिका उपलब्ध करुन त्वरीत कामास सुरुवात ही करण्यात आली आहे. त्यानंतर जलवाहिका भूमिपूजनही करण्यात आला. यावेळी नगरसेवक भगवान कटारिया ,पंढरीनाथ शिंदे,स्नेहा वीर, शाम कुकरेजा, भरत परदेशी, फिरोज खान, रुचिका दलवानी ,कर्नल शिरीष कुलकर्णी, सुरेश मागनाणी व अतुल भटनागर, महेश सैनी आदी उपस्थित होते.