नाशिक – दारणा पट्यातील तीन गावांमध्ये १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणूक घेण्यात आल्या. यामध्ये नाणेगाव येथे सर्वसाधारण असलेल्या जागेवर महिला तर दोनवाडे व लोहशिंगवे येथे सर्वसाधारण स्त्री राखीव जागांसाठी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुका पार पडल्या.
नाणेगाव
यामध्ये नाणेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा संजय काळे व उपसरपंच पदी विमल भगवान आडके यांची निवड करण्यात आली आहे. येथील सरपंचपदाच्या आरक्षणात सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाल्याने या गावात मोठे राजकीय समीकरण बदलल्याचे चित्र पहायला मिळाले. यामध्ये सरपंचपदाच्या निवडीसाठी येथील परिवर्तन पॅनलच्या वर्षा आडके यांनी गुप्त पद्धतीने निवडणूक घेण्याच्या केलेल्या मागणीला निवडणूक निर्णय अधिकारी रमेश उगले, तलाठी दत्ता चोळके यांनी उमेदवारांनी सहमती दर्शविली. यामध्ये वर्षा आडके यांचा १ मताने पराभव झाल्याने श्री विकास पॅनलच्या बिनविरोध निवडून आलेल्या नंदा काळे या सरपंचपदी विराजमान झाल्या तर उपसरपंच पदासाठी भारती शिंदे यांचाही १ मताने पराभव झाल्याने विमल आडके यांची १ मताने निवड करण्यात आली. यावेळी अशोक आडके, काळू आडके, आशा मोरे,अनिता आडके,ज्ञानेश्वर शिंदे,वासुदेव पोरजे,संपत बर्डे पोलिस पाटील संदीप रोकडे आदी उपस्थित होते.यावेळी देवळाली कॅम्प पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दोनवाडे
दोनवाडे ग्रामपंचायतीच्या शैला अशोकराव ठुबे यांची सलग तिसऱ्यांदा सरपंचपदी तर उपसरपंचपदी सविता शिरोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .दोनवाडे ग्रामपंचायतीमध्ये रा
लोहशिंगवे
लोहशिंगवे ग्रामपंचायत मध्ये सर्व जागा जिंकत श्री शेतकरी विकास पॅनलने सत्तापरिवर्तन केले होत होते येथील श्री शेतकरी विकास पॅनेलचे नेतृत्व पैलवान भगवान मारुती जुंद्रे व ॲड. त्र्यंबक लक्ष्मण जुंद्रे यांनी केले व सर्व जागांवर विजय संपादन केला होता.येथील सरपंचपदासाठी साधारपण स्त्री जागा आरक्षीत झाल्यामुळे पैलवान भगवानराव जुंद्रे यांची सून योगिता युवराज जुंद्रे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी रघुनाथ जुंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून विजय चौधरी, ग्रामसेवक उमेश चौधरी यांनी काम बघितले.यावेळी वाघचौरे अविनाश, जुंद्रे युवराज, पाटोळे सुनीता, जुंद्रे कविता,रघुनाथ जुंद्रे, लक्ष्मी माळी, संगीता पाटोळे, जुंद्रे अंबादास आदि उपस्थित होते.