नाशिकरोड – देवळाली कॅम्प येथील हाडोळा परिसरातील देवळाली कॅम्प येथून आकाश हरिश्चंद्र खरकवाल ( वय २४) हा तरुण घरात कुणाला ही न सांगता घरातून निघून गेला. याबाबत आकाशच्या आई कमला हरिश्चंद्र खरकवाल यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यात म्हटले की, माझा मुलगा आकाश खरकवाल ३ अँाक्टोंबर रोजी घरात न सांगता निघून गेला. आजुबाजुला चौकशी केली असता कुठे ही आढळुन आला नाही.
आकाश रंगाने गोरा, चेहरा उभट, दाढी वाढलेली ,शरीराने मध्यम ,उंची पाच फूट,अंगात काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पेंट घातलेली आहे ,कोणास आढळल्यास पोलिस नाईक प्रवीण गीते किंवा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.