देवळाली कॅम्प :- येथील महालक्ष्मी मंदिर परिसरसात असलेल्या भूमिगत गटारीच्या वाहिनी तुंबल्याने दूषित पाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या वर्षीच देवळालीतील विविध भागात केंद्राच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत भूमिगत गटाराचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या गटारांमधून पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या वाहिन्याचे पाईप हे केवळ सहा इंच इतक्या व्यासाचे टाकण्यात आले आहे. परिणामी वर्षभरात या वाहिन्या जागोजागी तुंबत आहे. या वाहिन्यांपैकी येथील सहा नंबर नाका परिसरात असलेल्या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतून पाणी बाहेर वाहत आहे.या दूषित पाण्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी ही बाब कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींच्या नजरेस आणून देऊन देखील कुठलीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून प्रशासनाच्या या ढिल्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.