नाशिक – भारतीय जनता पक्षाने देवळाली कॅम्प-भगूर मंडलाच्या अध्यक्षपदी मधुसूदन (कैलास) गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी ही निवड घोषित केली आहे. याप्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे यांनी उपस्थितांना पक्ष संघटना बांधणीचे मार्गदर्शन केले.
कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे म्हणाले की, देवळाली-भगूरच्या जुन्या जाणत्या नाराज दुखावलेल्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा पार्टीच्या कामात सक्रीय करुन पार्टीचे संघटनात्मक काम वाढण्यासाठी जोमाने कामाला लागू. पुन्हा भाजपाचा बालेकिल्ला उभा करण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया तानाजी करंजकर, कावेरी कासार, महानगर सरचिटणीस जगन पाटील, सुनील केदार, जीवन गायकवाड, आमोद शहाणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळातील जितेंद्र भावसार, दिनकर पवार, प्रवीण रोकडे, प्रताप गायकवाड, विशाल शिरसाट, हर्षद गायकवाड, शेखर कस्तुरे,संदीप शेटे, ललित भदे, स्वप्नील आहेर, गणेश गायकवाड, समाधान धात्रक, सुधीर मेढे, विलास गायकवाड आदी उपस्थित होते.