नाशिक – येथील शिवजयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर चारणवाडी येथील काही समाजकंटकांनी शुक्रवारी येथील त्रिमूर्ती चौक परिसरात गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करत हल्ला केला. या दगडफेकीत पोलीस शिपाई मनोहर साळुंखे तर पोलीस नाईक पंढरीनाथ सोपान आहेर हे जखमी झाले आहे. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हदीत कर्तव्य करीत असताना, संसरी येथील इसम चारणवाडी येथील एका इसमा बरोबर भांडण झाले म्हणून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. यावेळी चारणवाडी येथील सोनू जाधव हा हातात दगड घेऊन आला. यावेळी तो अमोल जाधव यास म्हणाला की फिर्यादी पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल. यावेळी त्याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी दगड डोक्यास लागल्याने पोलीस नाईक आहेर यांसह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे दाखल केले होते. येथे त्यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर श्रावण माने रोहित कुसमाडे,दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून उर्वरित नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी एकूण १४ आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.