नाशिक – देवळाली कॅम्प परिसरातील महालक्ष्मी मंदिर भागात बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याने कुत्र्याला गंभीर जखमी केले आहे. तसेच, लोहशिंगवे, राहुरी, सहा नंबर नाका आदी परिसरात बिबट्याची दहशत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. याची दखल घेत वनविभागाने तीन पिंजरे लावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देवळाली, लोहशिंगवे, राहुरी या परिसरात बिबट्याचा वावर आहे. सहा नंबर नाक्याजवळच लष्कराची हद्द आहे. या भागात बिबट्याच्या हालचाली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. वनरक्षक विजय पाटील यांनी या भागात पिंजरा लावला आहे. लोहशिंगवे येथेही पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच, आणखी एका भागात पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.