देवळाली कॅम्प :- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. यासाठी त्यांचे अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचे आहे. त्यासोबत या पक्षी संवर्धक असलेले मोहम्मद दिलावर यांनी नाशिकमधून या कार्याची सुरुवात केल्याचे प्राचार्य डॉ.विजय मेधने यांनी सांगितले.
येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने आयोजित चिमणीसह अन्य पक्षांकरिता आवारात सुमारे ५० हुन अधिक खाद्यपात्र उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रसंगी प्राचार्य बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खंडेराव मेढे, शंकर मुठाळ, मुकुंद पाळदे, गजीराम मुठाळ, ज्ञानेश्वर काळे, प्रशांत धिवंदे, उपप्राचार्य दौलत शिंदे, एस.एम.जाधव, चंद्रकांत संधान, शशिकांत अमृतकर,आदी उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ सोपान एरंडे यांनी चिमणी दिनाचे महत्व विशद करतांना या दिनाचा इतिहास सांगितला. यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ.मेधने म्हणाले कि, नॅचर फोरेवर सोसायटीच्या माध्यमातून साजऱ्या होणाऱ्या जागतिक चिमणी दिन हा आपण चिमण्यांसह अन्य पक्षांच्या संवर्धनासाठी महाविद्यालयातील प्राधापक व कर्मचारी यापुढे दररोज वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे सांगत या दिवशी या उपक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. आभार संगीता भामरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.पी.के.नेहे, प्रा.शोभा मेंगाने, प्रा.मिलिंद ठाकरे, प्रा.शिवाजी आंधळे, प्रा. सतीश कावळे आदींसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.