देवळाली कॅम्प :- कोविड काळात डॉक्टर,सामाजिक संस्था,आरोग्य कर्मचारी व नागरिकांनी केलेली सेवा ही राष्ट्रीयसेवा आहे आणि अशा सेवा करणा-यांचा माझ्या हस्ते झालेला सन्मान हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केले.
देवळालीत डॉ.गुजर सुभाष हायस्कुल येथे पार पडलेल्या रात्री कोव्हीड योद्ध पुरस्कार वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नवीन गुरुनानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड ,जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला, गोरखनाथ बालकवडे, एन.डी.गोडसे, गणेश गायधनी, विलास धुर्जड, अशोकराव पाळदे,रवींद्र भदाणे, डॉ. संजय धुर्जड,रवींद्र धुर्जड आदी उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतातून रतन चावला यांनी गेल्या आठ महिन्यांच्या कोविड काळात शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारच्या अन्नधान्य व भाजीपाल्याची कमतरता पडू दिली नाही ही मोलाची कामगिरी बजावल्याचे सांगतांना ते देखील खरे कोविड योद्धे असल्याचे सांगितले. प्रास्तविकातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऍड.बाळासाहेब आडके यांनी करोना काळात पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा सादर केला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाश लखवानी, देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, डॉ. संजय धुर्जड, नाशिक रोड व देवळाली गुरुद्वारा समिती, डॉ.एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनचे पंकज शेलार, बन्सीलाल गाडीलोहार,प्रेरणा बलकवडे,मनोज कनोजिया,अजय शिंदे,सोनू सचदेव व सहकारी , योगेश मोजाड, रामराव धोंगडे,कन्हैयालाल माखिजा,प्रशांत धिवंदे ,शरदचंद्र आडके, अक्षय विश्वकर्मा, धीरज डुलगज, लक्ष्मी पवार आदींचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार यांनी तर आभार ऍड. संजय ठाकूर यांनी मानले. याप्रसंगी ऍड.त्र्यंबक गोडसे, राजेंद्र जाधव, बबनराव ठुबे, ऍड.सोपान दंडगव्हाळ, ऍड.सुभाष हारक, ऍड.संदीप कदम,संजय गोडसे, जयराम चावला,मोहन मनवानी, मनोहर माखिजा,नरेश चावला, प्रकाश केवलानी, लियाकत काझी, मुलचंद अहुजा, अनिल ग्यानचंदानी, डॉ. नरेश चावला, देवी लखमियानी, संगीता सोनवणे,महिंद्रा कासार,निलेश हेंबाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.