देवळालीतील शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे यांचा पुढाकार
देवळाली कॅम्प: – ऑक्सिजन अभावी कोविड रुग्णांची अवस्था गंभीर होत आहे. अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहे अशा परिस्थितीत रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी शिवसेनेचे तालुका संघटक चंद्रकांत गोडसे व कॅन्टोमेन्ट बोर्डच्या माजी नगरसेविका आशा गोडसे यांनी दानशूरांसह स्वखर्चाने कॅन्टोमेन्ट हॉस्पिटलमध्ये असलेल्या डेडिकेटेड केअर सेंटरसाठी ३ लाख रुपये किमतीचे ५ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे देवळाली परिसरातून कौतुक होत आहे.
कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना अनेकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने प्राण गमावण्याची वेळ येत आहे नेमकी ही गरज ओळखून गंभीर झालेल्या रुग्णांना ऑक्सिजन बेडची मिळावे याकरता थेट मुंबई येथून पाच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन उपलब्ध करुन कोविड सेंटरला भेट देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. ऑक्सिजन यंत्रांमुळे आता अनेक गंभीर करोना रुग्णांना मदत होणार आहे. डॉ. जयश्री नटेश, प.स. सदस्य डॉ.मंगेश सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख साहेबराव चौधरी,रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष बोराडे,युवा सेना शहर प्रमुख प्रमोद मोजड,मनसे चे संजय गीते,सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष गोकुळ मोजाड, माधव गोडसे रवींद्र गायकवाड, विक्रम गोडसे, मधुकर गोडसे, गणेश देवकर आदी उपस्थित होते.