रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची अखेरची सभा खेळीमेळीत, विविध विषयांना मंजूरी

by India Darpan
फेब्रुवारी 9, 2021 | 2:31 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210209 WA0032

देवळाली कॅम्प –  गेल्या काही वर्षापासून शहराला पाणीपुरवठा करतांना प्रशासनाला सुमारे ५५ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असतांना या खर्च भरून निघणे कामी प्रशासनाने सुचवलेली दरवाढीला विरोध करत अखेर प्रती हजार लिटरमागे ७० पैश्याची दरवाढ करण्याचा निर्णयावर सहमती देण्यासोबत शहरात सर्वच व्यावसायिक व नागरी इमारतींना सीसीटीव्ही, नागरिकांच्या सुरक्षेकामी आवश्यक अग्निशमन यंत्रणा, रखडलेला अतिक्रमण व भूमिगत गटाराच्या कामाबाबचे प्रश्न   हॉस्पिटल सुविधा आदी मुख्य व गरजेच्या विषयांसह ३१ बांधकाम आराखड्यांना मंजूरी देण्याबरोबर विविध जनहिताच्या कामे करण्याचा निर्णय घेण्यासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखेरच्या बैठकीत चर्चा करण्यात येऊन ठराव करण्यात आले.

गुरुद्वारा रोडवरील कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेच्या सभागृहात पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर जे.एस.गोराया यांच्या अध्यक्षतेखाली ही अखेरची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक प्रभावती धिवरे,भगवान कटारिया, कावेरी कासार, बाबुराव मोजाड, मीना करंजकर, ब्रिगेडियर शक्ती वर्धन, कर्नल अतुल बिस्ट,कर्नल पुनीत संघेरा, ग्रुप कॅप्टन जे.मॅथ्यू ,मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत शहरातील सर्वच व्यावसायिक संकुलांमध्ये पोलिस आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सीसीटीव्ही आवश्यक करण्यात आले. शहरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या मटण व चिकन व्यासायिकांना आकारण्यात आलेला दंड कमी करणे, बहुप्रतीक्षित डायलेसिस युनिट कार्यान्वित करणे, शहरात शासन निर्णयानुसार वॉर्ड ५ मधील स्टेशनवाडी व वॉर्ड ७ मधील शिगवे बहुला येथे अंगणवाडी सुरु करणे, भगूर येथील रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कारवाई करणे, भूमिगत गटार योजनेअंतर्गत आठही वॉर्डात प्रॉपर्टी चेंबर निर्माण करून गटार जोडणी करणे, कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सर्व कंत्राटी डॉक्टर यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देणे व शहराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी फायर सेफ्टी यंत्रणा शाळा,लॉन्स,खाजगी हॉस्पिटल, व्यावसायिक संकुले, कोचिंग क्लासेस, नर्सिंग होम व खाजगी ओपीडी सेंटर यांना बंधनकारक करण्यात आली. याकामी आवश्यक असणाऱ्या सर्व परवाणग्या शासन नियंत्रित फी भरून कॅन्टोन्मेंट देणार असल्याचे निर्णय घेण्यात आले.

प्रशासकीय कामकाज प्रशासकीय अधिकारी उमेश गोरवाडकर, सहाय्यक अभियंता विलास पाटील, स्वप्नील शोत्रीय, राजिंदर ठाकूर, प्रभाकर दोंदे, रवींद्र नेरे आदींनी पाहिले. सभेच्या शेवटी प्रशासनाच्या वतीने ब्रिगेडियर जे.एस गोराया यांच्या हस्ते सर्व लोकनियुक्त व लष्कर नियुक्त सदस्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फाईव्ह स्टार हॉटेल नव्हे हॉस्पिटल; तुकाराम मुंढेंनी शेअर केला व्हिडिओ

Next Post

नांदगाव – बोलठाण येथे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची अज्ञाताने केली तोडफोड

India Darpan

Next Post
IMG 20210209 WA0033

नांदगाव - बोलठाण येथे पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची अज्ञाताने केली तोडफोड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011