नाशिक – देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, रिपाइं युतीचे सचिन ठाकरे यांची निवड झाली. त्यांचा एकमेव अर्ज आल्याने बोर्ड अध्यक्ष ब्रिगेडियर जीएस गोरया यांनी ठाकरे यांच्या नावाची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केली. यावेळी बोर्डाचे नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, कावेरी कासार , प्रभावती धिवरे, आशा गोडसे, मीना करंजकर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, कर्नल अतुल बीस्ट आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे नाशिक शहर अध्यक्ष गिरीश पालवे यासह भाजप रिपाइं समर्थकांनी ठाकरे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.