नाशिक – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टॉन्मेंट बोर्ड परिसरासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी यासंदर्भातील एक आदेश पारित केला आहे. देवळालीतील सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांना कळविण्यात येते की, आपल्या शहरात शनिवार-रविवार ऐवजी देवळाली कॅम्प रविवार व सोमवारी बंद असेल. यामध्ये जीवनावश्यक सामग्रीची दुकाने सुरू राहतील. याबाबतचे आदेश बोर्डाचे सीईओ व इन्सिंडर कमांडर असलेले अजय कुमार यांनी पारित केले आहेत.