देवळाली कँम्प : – छावणी परिषदेला तीन दिवसांपासून रेमडेसीवर इंजेक्शन्सचा पुरवठा जिल्हा प्रशासनाकडून झालेला नसल्याची तक्रार येथील स्थानिकांची आहे. १५ एप्रिल शुक्रवार पासून छावणी प्रशासनाने २७ रेमडेसिवीरची मागणी केल्यानंतर सुध्दा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्याबाबत अनास्था दाखविण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरची शोधाशोध करून धावपळ करावी लागत असून सोमवार पर्यंत इंजेक्शन न मिळल्यास आंदोलन करु अशा इशारा जीवन गायकवाड, अँड बाळासाहेब आडके,सचिन ठाकरे,बाबूराव मोजाड,,तानाजी करंजकर, तानाजी भोर,वैभव पाळदे,रोहित कासार,सुरेश निकम,सोमनाथ खताळे या सर्व पक्षांच्या पदाधिका-यांनी दिला आहे
देवळाली छावणी परिषदेच्या दवाखान्यात दाखल रुग्णांपैकी २७ रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असल्याने सदर मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती .सदर इंजेक्शन मिळण्याकामी तीन दिवसापासून मेल पाठवून छावणी परिषदेकडून दररोज मागणी नोंदवली जाते. तसेच इंजेक्शन मिळावे याकरिता कर्मचारी सकाळीच नाशिकला जातात पण सांयकाळी पर्यंत त्यांना थांबवून सांयकाळी इंजेक्शन संपल्याची माहिती देण्यात असल्याचे येथील कर्मचारी सांगतात.