महिलांच्या हातून अविस्मरणीय कार्य घडावे – अस्मिता देशमाने
…..
देवळाली कॅम्प- समाजात महिलांनी केलेली प्रगती ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून तळागाळातील महिलांना पुरस्काराच्या माध्यमातून वेगळे कार्य करण्याची उर्मी भरली जाते. अशा महिलांना आपण पाठबळ दिल्यास समाजात पुढे त्या निश्चितच अविस्मरणीय कार्य करतील असा विश्वास अखिल भारतीय मराठी महिला महासंघाच्या अस्मिता देशमाने यांनी व्यक्त केला.
देवळालीच्या डायमंड कॉटेजच्या प्रांगणात काल शनिवार १६ रोजी सांयकाळी देवळाली इनरव्हील क्लब व अखिल भारतीय मराठी महिला महासंघाच्या वतीने मॉडर्न हिरकणी व राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर अस्मिता देशमाने, रतन चावला, निवेदिता अथनी, प्रा.सुनीता आडके, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीना पाटील,सुरेश कदम, संजय गोडसे, अंजली शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. प्रास्ताविकातून इनरव्हिलच्या अध्यक्षा पाटील यांनी आजची महिला ही घर व कामाची सांगड घालत जीवनाशी लढा द्यायला शिकली असून असाच लढा देणाऱ्या महिलांचा दरवर्षी आपण मॉडर्न हिरकणी व राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करणार असल्याचे सांगितले. तर प्रमुख अतिथी चावला यांनी विविध क्षेत्रात महिलांनी भरारी घेतलेली आहे.त्याचसोबत होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी तिने साहसी बनणे देखील आवश्यक असल्याचे सांगितले. प्रा.सुनीता आडके यांनी राजमाता जिजाऊंचे विचार आजही कसे दिशादर्शक असल्याचे आपल्या मनोगतातून कथन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा मॉडर्न हिरकणी व राजमाता जिजाऊ पुरस्कार मानाची साडी, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. पुरस्कारार्थींच्या वतीने संगीता सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन मोनिका लोखंडे तर आभार कमलेश वर्मा यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशा शेट्टी,भाग्यश्री आढाव, संतोष शिंदे, सुरेखा गुप्ता, ज्योती जॉर्ज, संतोष डाके आदींसह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील होते.