गुरूवार, डिसेंबर 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दृष्टीहीन अजय लालवाणी या युवकाने चालवली १२ दिवसात २०१० किमी सायकल

डिसेंबर 7, 2020 | 3:54 pm
in संमिश्र वार्ता
0
amravati 11 1140x570 1

अमरावती – जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टीहीन अजय लालवाणी यांनी १२ दिवसात दादर-गोंदिया २०१० किमी सायकल ने प्रवास करून विक्रम स्थापित केला आहे. त्यांच्या विक्रमाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जंगी स्वागत  करण्यात आले.

अजय लालवाणी एक पंचविशीतला युवक जन्मापासून अंध असून विविध क्रीडा प्रकारात आपले प्राविण्य ते दाखवीत आहेत. बृहन्मुंबई येथील महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागात आपत्कालीन व्यवस्थापन खात्यात नोकरीला असलेल्या अजय लालवानी यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टीहीन व मूकबधीरांच्या जागतिक ज्युडो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

जून २०१९ मध्ये  हिमालयातील ‘फ्रेन्डशिप पीक’ व ऑगस्ट २०१९ मध्ये ‘माऊंट युनुम’ ही शिखरे पादाक्रांत केली. डिसेंबर २०१९ मध्ये मुंबई-गोवा हे १२०० किमी अंतर सायकलने सात दिवसात पार केले.  सलग दोन वर्षे जलतरण स्पर्धेत राज्य व विभागीय पातळीवर ‘फ्री स्टाईल’, ‘ब्रेस्ट स्ट्रोक’ व ‘बटरफ्लाय’ प्रकारात पदके जिंकली. दिव्यांगांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले, व तीन खुल्या मॅरेथॉन शर्यतीत त्यांनी भाग घेतला आहे.    दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात मागील चार वर्षापासून मल्लखांबाचा सराव करीत आहे. आता मुंबई ते गोंदिया व परत हे २०१० किमी अंतर सायकलवरून १२ दिवसात पार करण्यासाठी सिद्ध झाला आहे.

गुरुवार, दि. ३ डिसेंबर २०२० रोजी पहाटे चार वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील श्री समर्थ व्यायाम मंदिरासमोरून त्याची ही ऐतिहासिक सायकल दौड सुरु झाली होती. त्याला प्रा संदेश चव्हान रत्नागीरी आयन बॉल अंबासिटर  गोपीनाथ आरज (४१), भगवान पाटील (३५)दापोली ल,राजे स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रक्षिक्षक प्रा.संदेश चव्हाण(३२),प्रा.प्रशांत देशमुख (३५), प्रथमेश अडवडे (२०),निरंकार पगडे(१३), मंदार पाटील (१८), गणेश सोनावणे (२२), रितिक कासले (१८),  अण्णासाहेब घुमरे (४९) ही मंडळी साथ देत आहेत. दररोज सुमारे १७० किमी अंतर पार करून वाटेत नाशिक, धुळे, दाताले, अमरावती, व नागपूर या पाच ठिकाणी तो रात्रीची विश्रांती घेईल.

८ डिसेंबर २०२० रोजी गोंदिया येथे पोचून दि. ९ डिसेंबर २०२० रोजी तो परत निघेल व याच मार्गाने दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी मुंबईस परत येईल. हे शिवधनुष्य उचलण्यामागचा त्याचा उद्देश स्पष्ट आहे. ‘माझ्या दिव्यांग मित्रांनीही पुढे येऊन असे उपक्रम करून बघावेत, त्यात सहभागी व्हावे , तुमची चिकाटी व तुमचे धैर्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही, उलट तुम्हाला दुप्पट सामर्थ्य देते हे, आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे.’

‘गेले आठ महिने सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठी शासनाचे सर्व निर्बंध पाळून अत्यंत जबाबदारीने आखलेली ही साहसी मोहीम करोनाच्या वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी केवळ माझ्या दिव्यांग बांधवांनाच नव्हे तर इतरही सर्वांनाच एक नवी उमेद, उत्साह व उभारी देईल’ असा विश्वास त्यांनी सत्कारानंतर बोलतांना दिला. अजयचे पुढचे स्वप्न ऑक्टोबर २०२१ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३७०० किमी अंतर सायकलवरून २५ दिवसात पार  करण्याचे आहे. ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठीही याची नोंदणी करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तेलगू अभिनेत्री विजयशांती पुन्हा भाजपात; तेलंगाणात फायदा होणार

Next Post

नाशिक महापालिकेच्या महासभेत झाले हे ४ महत्त्वाचे निर्णय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
Nashik mahanagarpalika

नाशिक महापालिकेच्या महासभेत झाले हे ४ महत्त्वाचे निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011