बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन; महायुतीच्या बैठकीत निर्णय

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 12:52 am
in इतर
0
milk

मुंबई –  दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी (११ ऑगस्ट) झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना ५ लाख निवेदने देणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) अविनाश महातेकर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रीतम मुंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे व भाजपा प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे उपस्थित होते.

बैठकीनंतर पाटील यांनी सांगितले की, दोनदा आंदोलन करूनही राज्य सरकारने दूध उत्पादकांना सरसकट अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला नाही. महायुतीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन आपल्या मागण्या सरकार दरबारी मांडल्या. माध्यमांनीही या आंदोलनांची दखल घेतली. मात्र राज्य सरकारने गेंड्याची कातडी पांघरून या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. दूध आंदोलनाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असूनही हा विषयही केंद्र सरकारच्या माथी मारण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहेत. यावरून राज्य सरकार कशाप्रकारे आपल्या जबाबदारीची चालढकल करत आहे हे दिसून येते.

अशा स्थितीत महायुती दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. दूध उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याखेरीज स्वस्थ बसायचे नाही, असा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारच्या कार्यकाळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य अनुदान देऊन त्यांचा प्रश्न सोडवला होता. आत्ताचे सरकारही यासाठी बांधील आहे. तेव्हा हे दूध आंदोलन अधिकाधिक तीव्र करून शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी १३ ते १९ ऑगस्ट दरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो ५० रू. अनुदान द्यावे तसेच गाईच्या दुधाला ३० रू. दर द्यावा या मागण्यांचे लेखी पत्र, ई-मेल, फोन कॉल किंवा इन्स्टाग्राम या विविध मार्गांनी ५ लाख निवेदने मुख्यमंत्र्यांना देऊन आंदोलन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…अन् चर्चेसाठी मंत्री थेट बसले जमिनीवरच! मेस्टा पदाधिकारीही झाले अचंबित

Next Post

केंद्राच्या पर्यावरण मसुद्याविरोधात आता राज्य सरकारही; पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी

Next Post
aditya thackray 750x375 1

केंद्राच्या पर्यावरण मसुद्याविरोधात आता राज्य सरकारही; पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025

स्वस्त धान्य दुकानदाराचा रेशनवर डल्ला…८४ क्विंटल धान्य केले परस्पर हडप

जून 18, 2025
Nitin Gadkari e1708960950705

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

जून 18, 2025
Raj Thackeray

राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी पाठवले हे पत्र….

जून 18, 2025
01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011