नाशिक – नाशिक जिल्ह्यासह मुंबईची तहान भागविणारा म्हणून इगतपुरी तालुक्याची ओळख आहे. सर्वाधिक वृष्टीचा आणि धरणांचा तालुका म्हणूनही तो ख्यात आहे. असे असतानाही या तालुक्यातील आदिवासी बांधवांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावरच भावली धरण आहे. याच धरणालगत गवांदे हे गाव आहे. या गावात पाण्याची अतिशय चणचण आहे. त्यामुळे बापड्या या महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे. सरकारच्या असंख्य योजना असल्या, अनेक निवडणुका गेल्या, अनेकानेक लोकप्रतिनिधी हात जोडून वारंवार येतात पण पाण्याची समस्या काही सुटलेली नाही. त्यामुळेच ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती या ग्रामस्थांची आहे.
व्हिडिओ सौजन्य – संजय अमृतकर