दुबई – संयुक्त अरब अमिराती मधील दुबई शहरातून तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या राजकुमारीचा व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला आहे. तीचे वडील शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम हे दुबईचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती देखील आहेत. आता या राजकुमारीचा पुन्हा शोध घेण्यात येत आहे.
या संदर्भात असे सांगण्यात येते की, इ.स. 2018 मध्ये राजकुमारी शेख लतीफा बिन मोहम्मद अल मकतूम ही एका मित्राच्या आणि फ्रेंच मधील एका माजी गुप्तहेरच्या मदतीने देशाबाहेर एका बोटीतून पळून जात असताना तिला परत आणून बंदी करण्यात आले.
ती दुबईच्या एका शक्तिशाली राज्यकर्त्याची मुलगी असून एका नव्या व्हिडिओमध्ये ती दिसली आहे. या व्हिडिओमध्ये राजकुमारी असे सांगत आहे की, या कठीण परिस्थितीत मी टिकून राहू शकेल की नाही हे मला माहिती नाही. परंतु यातून मला बाहेर पडायचे आहे. मी बंधक आहे. या महलाचे एका कारागृहात रूपांतर झाले आहे, असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
बाहेरची ताजी हवा देखील मी घेऊ शकत नाही. मला कधी सोडण्यात येईल हे मला ठाऊक नाही. आणि सोडल्यास काय परिस्थिती असेल. दररोज मी माझ्या सुरक्षिततेबद्दल आणि माझ्या आयुष्याबद्दल चिंता करते आहे, असे सांगणारा तिचा व्हिडिओ बीबीसीने जारी केला आहे. त्यामध्ये शेख लतीफा ही राजवाड्यातील तुरुंगात दिसली आहेत,