नाशिक – दुधाला सरसकट १० रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदानाच्या मागणीसाठी भाजपतर्फे आज सकाळी ९ वाजता सय्यद पिंपरी येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता दहावा मैल येथे रास्ता रोको करणार असल्याची माहिती भाजपतर्फे देण्यात आली.
राज्यभर आंदोलन
शासनाकडून दुधाला अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभर १ ऑगस्ट रोजी आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.