नाशिक : दुचाकी घसरून एक युवक ठार झाल्याची घटना पाथर्डी- विनयनगर रोडवर घडली. हरूण हनिफ शेख (३२, रा. सुकदेवनगर, पाथर्डी गाव) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी शेख हा पाथर्डी गावाकडून विनयनगरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होता. दरम्यान, गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाच्या समोर त्यांची दुचाकी घसरून ते रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.