मुंबई – बॉलीवूडचे नट-नट्या आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधण्यासाठी सतत सोशल मिडीयावर काहीतरी चर्चा घडवून आणत असतात. त्यासाठी ते स्वतः अॅक्टीव्ह राहत असतात. त्यासाठी बरेचदा प्रश्नोत्तराचा खेळही सेलिब्रिटीज खेळत असतात. अलीकडेच दीपिका पादुकोण हिने आपल्या एका चाहत्याला दिलेले उत्तर जास्तच चर्चेत आहे.
तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत प्रश्नोत्तरचा खेळ खेळला. अनेक प्रश्नांना दीपिकाने गंमतीदार उत्तरे दिली. त्यामुळे चाहत्यांचाही उत्साह वाढत होता. यातच एका चाहत्याने कोणता आवडता पदार्थ बनवायला आवडतो, असा प्रश्न विचारला. त्यावर दीपिकाने कुकीज असे उत्तर दिले. तिला कुकीज बनविण्यात खुप आनंद मिळतो.
एका चाहत्याने प्रश्न विचारला की तू सकाळी उठल्यावर सर्वांत पहिले काम कोणते करते? चाहत्याच्या या प्रश्नाला दीपिकाने गमतीदार उत्तर दिले. ती म्हणाली, मी सर्वांत पहिले अलार्म बंद करते. याशिवायही अनेक प्रश्न दीपिकाला विचारण्यात आले. त्यावरही तिने गंमतीदार उत्तरे देऊन खिळवून ठेवले.
अलिकडेच दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरील सर्व पोस्ट अचानक डिलीट केल्या होत्या. त्यानंतर साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण आता ती पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाल्यामुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.