मुंबई – ड्रग्ज सेवन प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची तब्बल ५ तास चौकशी केली. ड्रग्ज कुठून येते, कोणे देते, कुणाला देते, तिने किती वेळा ड्रग्ज घेतले यासह अनेक प्रश्नांचा भडिमार तिच्यावर करण्यात आला. मात्र, मी ड्रग्ज घेतले नाही, असे दीपिकाने सांगितल्याचे समजते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज सेवनचा मुद्दा समोर आला आहे. त्याच अनुषंगाने एनसीबीने काही सेलिब्रेटींना नोटिस बजावल्या आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे. शनिवारी दीपिकासह श्रद्धा कपूर व सारा अली खान यांचीही एनसीबीने कसून चौकशी केली. व्हॉटसअॅप ग्रुप मध्ये ड्रग्जविषयी चॅट करण्यात आले.
तिघांना अटक
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यालाही एनसीबीने अटक केली आहे. तर सेलिब्रेटींना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या दोन जणांना मुंबईतून एनसीबीने अटक केली आहे. या दोघांकडून साडेपाच लाखांचे ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे.