नाशिक – जिल्हा परिषद नाशिकच्या आवारात जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांनी बनवलीलेल्या दिवाळी उपयोगी आकाश कंदील, रंगीबिरंगी पणत्या, दिवाळी फराळ इत्यादी वस्तुंचे दिव्यांग बांधवांसाठी काम करणा-या सामजिक संस्थांना समाज कल्याण विभागाने जिल्हा परिषदेच्या आवारात या वस्तुंच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली,
दिव्यांग बांधव हे दरवर्षी दिवाळी त्याच बरोबर इतर सणांनिमित्त विविध उपयोगी वस्तू तयार करुन सामजिक संस्थांच्या माध्यमातुन विक्रीस आणतात या वर्षी कोरोना संकटामुळे दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या या वस्तू नेमक्या विकायच्या कुठे असा प्रश्न दिव्यांग बांधवांसाठी काम करणा-या संस्थांना पडला होता, त्यांनी याबाबतची कैफियत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड व समाज कल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांच्यासमोर मांडली असता बनसोड यांनी लगेचच जिल्हा परिषदेच्या आवारात या दिव्यांग बांधवांसाठी काम करणा-या संस्थांना जिल्हा परिषदेच्या आवारात दिव्यांग कल्याण कक्षासमोरच जागा उपलब्ध करुन दिली त्यामुळे या सामाजिक संस्थांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानत त्यांच्याच हस्ते या वस्तुंच्या विक्रीचे स्टॉलचे उद्घाटन केले, यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे आदी उपस्थित होते.