दानशूराच्या मदतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप
देवळाली कॅम्प :– दिव्यांग बांधव हे समाजातीलच एक घटक असून त्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वच स्तरासह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड देखील प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक बाबुराव मोजाड यांनी केले. येथील पूज्य सिंधी पंचायत हॉलमध्ये प्रहार संघटनेच्या अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा संपर्कप्रमुख जॅकब पिल्ले यांनी दानशूराच्या मदतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी मोजाड बोलत होते. यावेळी मंचावर मनपा नगरसेवक जगदीश पवार, सिंधी पंचायतीचे अध्यक्ष रतन चावला, पोपट जाधव, दत्ताजी सुजगुरे, संतोष कटारे, जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे, उपाध्यक्ष संतोष मानकर,अमजद पठाण, सचिव बच्चू निकाळजे, संघटक रवींद्र टिळे, महिला संघटक संध्या शिरसाठ,दत्ता काने विजय सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिगवे बहुला येथील दिव्यांग बांधवांससायकल वाटप करण्यात आले.अध्यक्षीय भाषणातून जिल्हाध्यक्ष दिलीप दिघे यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधव समाजात वावरतांना आज कोठेही कमी पडत नसल्याचे सांगतांना गरजू दिव्यांग बांधवांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर बिटको येथील रुग्णालयात दिव्यांगाच्या प्रमाणपत्राची सोया व्हावी अशी मागणी महिला संघटक संध्या शिरसाठ यांनी केली. त्यानंतर देवळालीतील पत्रकार सुधाकर गोडसे, प्रकाश टाकेकर, सादिकभाई कॉन्ट्रॅक्टर, प्रशांत धिवंदे,संजय गोडसे, संजय निकम,सुभाष कांडेकर, गोकुळ लोखंडे, प्रमोद मोजाड, गीतिका सचदेव, इरफान पठाण आदींचा पत्रकार गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सुत्रसंचालन प्रमोद मोजाड यांनी तर आभार जितू देवकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत वालझाडे,बबलू मिर्झा, ललित पवार, रुपेश परदेशी आदींसह सदस्य प्रयत्नशील होते.