मुंबई – आयपीएल २०२० च्या गव्हर्नींग कौन्सीलने प्लेऑफ सामन्याचे वेळापञक नुकतेच जाहीर केले असून त्यानुसार अंतीम सामना १० नोव्हेंबर २०२० रोजी दुबईत खेळवला जाईल.
साखळी सामने संपल्यानंतर जे ४ संघ गुणांच्या टेबलमध्ये पहिल्या ४ मध्ये जागा मिळवितात त्यांच्यात प्ले ऑफ सामने खेळविले जातात. आयपीएलतर्फे या सामन्याचे वेळापत्रक दरवेळी आधीच जाहीर केले जात असते, परंतु यावेळी मात्र साखळीतले काही सामनेच शिल्लक राहीलेले असतांना हे वेळापञक जाहीर झाले आहे. या फेरीतील चार सामन्यांपैकी दोन सामने दुबईत तर दोन सामने अबुधाबीत खेळविले जातील. विशेष म्हणजे, यापैकी एकही सामना शारजाह मध्ये खेळविला जाणार नाही.
या प्ले–ऑफ फेरीची मेख अशी असते की, साखळीत पहिल्या दोन स्थानांवर जे संघ येवून धडकतील त्यांना क्वालिफायर सामना क्र.१ सामना खेळावा लागतो. यात जो संघ विजेता ठरतो, तो थेट अंतिम सामन्यात जातो आणि जो संघ पराभूत होतो तो क्वालिफायर सामना क्र.२ सामन्यात पोहोचतो. माञ, साखळीमध्ये जे संघ ३ व ४ क्रमांकावर रहातात त्यांना लक आजमावण्याचे हे दुहेरी भाग्य मिळत नाही. या दोन्ही संघाना सर्वप्रथम एक एलिमीनेटर सामना खेळावा लागतो आणि त्यानंतर जो संघ विजेता ठरेल तो क्वालिफायर सामना क्र.२ मध्ये पोहाचतो तर पराभूत संघ शर्यतीतून बाद होतो. क्वालिफायर सामना क्र.२ चा विजेता अंतिम सामन्यात पोहोचतो.
आयपीएल २०२० प्ले–ऑफ फेरीचे वेळापञक पुढीलप्रमाणे आहे
क्वालिफायर सामना क्र.१ –
गुणांच्या टेबलमधील संघ क्र.१ विरूध्द संघ क्र.२
दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी दुबईत.
एलिमीनेटर –
गुणांच्या टेबलमधील संघ क्र.३ विरूध्द संघ क्र.४
दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी अबुधाबीत.
क्वालिफायर सामना क्र.२ –
एलिमीनेटर सामन्याचा विजेता संघ विरूध्द क्वालिफायर सामना क्र.१ यातील पराभूत संघ.
दि.८ नोव्हेंबर २०२० रोजी दुबईत.
अंतिम सामना
क्वालिफायर सामना क्र.१ यातील विजेता संघ विरूध्द क्वालिफायर सामना क्र.२ यातील विजेता संघ
दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी अबुधाबीत.