नवी दिल्ली – खरेदीसाठी धनत्रयोदशी हा शुभ मुहूर्त मानला जातो. असे म्हणतात की, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केल्याने व्यवसायात प्रगती होते व घरात शांतता असते. दिवाळीच्या मुहूर्तावर बजाजतर्फे उत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल झाली आहे.
बजाजची रेट्रो स्कूटर चेतक
बजाजने या वर्षाच्या सुरुवातीस रेट्रो स्कूटर चेतक लॉन्च केली आहे. अतिशय आलिशान लूक आणि ड्रायव्हिंग रेंजने सुसज्ज असलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपये आहे. चेतकचा इलेक्ट्रिक अवतार अर्बन आणि प्रीमियम या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये अर्बनची किंमत १ लाख रुपये आणि प्रीमियम किंमत १.१५ लाख रुपये आहे. या स्कूटरचे प्रीमियम मॉडेल फ्रंट डिस्कसह येते, तर अर्बनला फ्रंट ड्रम ब्रेक उपलब्ध आहे.
एकाच चार्जिंगवर चालते ९५ किमी
बजाज चेतकमध्ये ६०.३Ah लिथियम आयन बॅटरी आहे. इको मोडमध्ये ९५ किमी आणि स्पोर्ट मोडमध्ये ८५ किमी अंतरावर चालत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्याच वेळी ५ AMP पॉवर सॉकेटद्वारे 5 तासात पूर्णपणे चार्ज होते. तसेच २५ टक्केपर्यंत चार्ज होण्यासाठी फक्त एक तास लागतो.
कंपनीतर्फे बॅटरीवर वॉरंटी
बजाज चेतकच्या बॅटरीसह कंपनी ३ वर्ष किंवा ५० हजार किमीची वॉरंटी देत आहे. या स्कूटरची बॅटरी सुमारे ७० हजार किमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.