मुंबई – राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळी नंतर हळूहळू खुली करण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
मंदिरे खुली करतांना संपूर्ण खबरदारी पाळण्यात येईल असे ते म्हणाले. नियमांचे पालन करून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला अशी आश्वासकता त्यांनी यावेळी दिली. मंदिरे उघडत नसल्याने सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे, परंतु त्यामागे नागरिकाचे प्राण, त्यांची खबरदारी महत्वाची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने कोणत्याही प्रकारे त्यात वाढ होणार नाही यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व सणाच्या काळात खबरदारी पाळण्याचे सांगितले.
राज्यात कोरोनाचा आलेख कमी होत आहे. मात्र, दिल्लीमधील कोरोना रुग्णांमध्ये सध्या वाढ होत आहे. कोणत्याही परिस्थिती कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.