नवी दिल्ली – कोरोना संकटाच्यावेळी व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी विक्रमी ७२ हजार कोटी रुपयांची विक्री केली. व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना कॅटने ही माहिती दिली आहे. कॅटच्या मते चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यामुळे या दिवाळीत चीनला ४० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, लोकल फॉर वोकलमधून स्वदेशी वस्तूंची विक्री वाढली आहे.
महत्त्वाचे म्हणजे आत्मनिर्भर भारत मोहिमेचा भाग म्हणून पंतप्रधानांनी या दिवाळीत व्होकल फॉर लोकल (घरगुती वस्तूंच्या खरेदीवर जोर दिला होता. या मोहिमेमध्ये सामील होत असताना कॅटने देशभरातील व्यावसायिकांना चिनी वस्तूंची विक्री करु नये अशी विनंती केली होती. या वेळी हा परिणाम दिसून आला आहे. कॅटकडे जाहीर केलेला आकडे २० शहरांचा आहे. दिवाळीच्या काळात व्यावसायिक बाजारपेठेत जोरदार विक्री झाल्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या मंदीचे सावट कमी झाल्याचे कॅटने म्हटले आहे.
दिवाळीत ज्या वस्तूंची सर्वाधिक मागणी असते त्यामध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू, खेळणी, विद्युत उपकरणे व इतर उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाकघरातील वस्तू, भेट वस्तू, मिष्ठान्न वस्तू, मिठाई, गृहसजावट, भांडी, सोन्यासह इतर वस्तूंचा समावेश आहे. दागिने, शूज, घड्याळे, फर्निचर, कपडे आदी वस्तू खरेदी केल्या आहेत.