नाशिक – दिवाळी सणाच्या नाशिक पोलिसांनी नाशिककरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सोबतच त्यांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ते असे
1) सध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नका.
2) दिवाळी किंवा लग्न समारंभ करिता बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे.
3) आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलीसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी.
4) चेन स्नचींग होऊ नये म्हणून बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये. तसेच बाहेर रस्त्याने पायी जात असताना महिलांनी त्यांचे मंगळसूत्र झाकून चालावे.
5) प्रवासात कोणीही दिलेले खाद्य पदार्थ किंवा पेय खाऊ पिउ नयेत..त्यामध्ये गुंगीचे औषध असू शकते.
6) प्रवासात अनोळखी महिला, पुरुषांपासून सावध रहावे.
7) गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवावे.
8) व्यापारी, दुकानदार, सराफ यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, CCTV कॅमेरे लावावेत.
9) बाजारामध्ये खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थीत ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करून ठेवावी.
10) कोणत्याही प्रकारे ऑनलाईन फ्रॉडच्या आमिषाला बळी पडू नये.
11) फोनवर आपल्या बँक खात्याचा एटीएम चा पासवर्ड तसेच फोन पे, गुगल पे, पेटीएम इत्यादी प्रकारच्या ऑनलाईन ट्रांजेक्शन बाबतचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका.
12) एमआयडीसी परिसरातील कंपनी मालक तसेच वर्कशॉप मालक यांनी कंपनी बंद ठेवताना सुट्ट्यांचे दिवसातील सुरक्षिततेचा विचार करून सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच सीसीटीव्ही कॅमेरे व इतर आवश्यक उपाययोजना कराव्यात.
13) परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये काही संशयीत हालचाली, संशयीत इसम किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास किंवा दिसल्यास पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.