मुंबई – दिवाळीच्या सुट्या अवघ्या चार दिवस जाहीर झाल्याने राज्यभरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर त्याची दखल घेत दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्या आता उद्यापासूनच मिळणार आहेत. येत्या ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत आता दिवाळीच्या सुट्या राहणार आहेत. या निर्णयाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकडून स्वागत केले जात आहे.