मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत.
या गाड्यांचे आरक्षण टप्प्याटप्प्यानं उपलब्ध केले जात आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. आरक्षणासाठी प्रवाशांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व सूचना तसंच नियमांचे काटेकोर पालन करत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत.