नाशिक – ओझर येथील नाशिक विमानतळावरुन स्पाईसजेट कंपनीच्या नाशिक-नवी दिल्ली, नाशिक-हैदराबाद आणि नाशिक-बंगळुरू या तीन शहरांसाठीच्या विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्त ओझर येथील विमानतळावर छोटेखानी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, स्पाईसजेटचे वरिष्ठ अधिकारी, हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत.
भुजबळ यांच्या कार्यकाळातच ओझर विमानतळावरील पॅसेंजर टर्मिनलचे काम करण्यात आले. आता याठिकाणाहून प्रवासी विमानसेवा वेग घेत असल्याने भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. या सेवेमुळे नाशिकच्या उद्योग, व्यवसाय, पर्यटन अशा विविध क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
स्पाईसजेटच्या तिन्ही शहरांच्या विमानसेवा बुकींगला ८० टक्के प्रतिसाद असल्याने कंपनीमध्येही समाधानाचे वातावरण आहे. केंद्र सरकारच्या उडान या योजनेअंतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे नाशिकहून बंगळुरू किंवा बंगळुरुहून नाशिक अवघ्या एका तासातच गाठणे शक्य झाले आहे. यापूर्वी जेट एअरवजेच्या नाशिक-दिल्ली विमानसेवेला ९८ ते १०० टक्के प्रतिसाद होता. आता दिल्लीसह बंगळुरूही नाशिकशी कनेक्ट होणार आहे.
नाशिकमधून या आहेत विमानसेवा
अलायन्स एअर – नाशिक-पुणे, नाशिक-हैदराबाद, नाशिक-अहमदाबाद
ट्रुजेट – नाशिक-अहमदाबाद
स्पाईसजेट – नाशिक-हैदराबाद, नाशिक-बंगळुरू, नाशिक-नवी दिल्ली
नाशिक विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे