नाशिक – नाशिककरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेली विमानसेवा येत्या २० नोव्हेंबरपासून वेग घेणार आहे. स्पाईसजेट या आघाडीच्या कंपनीने नाशिकहून नवी दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या तीन शहरांसाठीची विमानसेवेचे बुकींग सुरू केले आहे. अवघ्या ३ ते ४ हजार रुपयात या शहरांना जाणे शक्य होणार आहे.
सद्यस्थितीत अलायन्स एअरची हैदराबाद आणि अहमदाबाद तसेच ट्रुजेट या कंपनीची अहमदाबाद या विमानसेवा ओझर विमानतळावरुन सुरू आहेत. त्यात आता स्पाईसजेटच्या बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद या तीन सेवा सुरू होणार आहेत. त्यामुळे नाशिक हे आता चार शहरांसाठी कनेक्ट होणार आहे. तर, अहमदाबाद आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी दोन कंपन्यांच्या सेवा राहणार आहेत. या सेवेमुळे नाशिकच्या उद्योग आणि व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
विमानसेवेचे वेळापत्रक आणि तिकीटाचे दर असे
(ISK- Nashik. HYD- Hyderabad. BLR- Bangalore. DEL- New Delhi)