नवी दिल्ली – इस्त्रायली दूतावासाजवळ दिल्लीत शुक्रवारी झालेल्या स्फोटाचे इराण कनेक्शन समोर आले आहे. एक पाकीट घटनेनंतर हाती लागले असून त्यातून हा उलगडा झाला आहे. बदला घेण्याच्या उद्देशाने हा स्फोट घडवून आणला असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता या दिशेने तपास केला जात आहे.
गुप्तचर संस्थेच्या हाती लागलेल्या पाकीटात २०२० मध्ये मारल्या गेलेल्या कासिम सुलेमानी आणि इराणचे वरिष्ठ न्यूक्लियर सायंटिस्ट मोहसिन फखरीजादेह यांचाही उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पाकीटाचे आता टच स्क्रिन केले जाणार आहे. दरम्यान गृह मंत्री अमिल शाह यांनी आपला बंगाल दौरा रद्द केला आहे. तर देशात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
२०१२ मध्ये इस्त्रायलच्या एका कारमध्ये स्फोट
२०१२ मध्ये इस्त्रायलच्या एका कारमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यातही इराणचे दोन लोक सहभागी झाले होते. या घटनेनंतर ते फरार झाले. पण, त्याचा शोध गुप्तचर संस्था अद्यापही घेत आहे. स्फोट करणारे हे लोक दिल्ली येथील पहाडगंज हॅाटेलमध्ये थांबले होते. त्यामुळे अगोदर घडलेली घटना व आताचा स्फोट याचा संबध आहे का याचाही शोध घेतला जात आहे.