नाशिक: दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी शनिवारी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथून वाहनांचा जत्था नागपूरकडे रवाना झाला. या शेतकरी जत्थ्याचे नेतृत्व किसान सभा राज्य सचिव राजू देसले करीत आहेत. या प्रसंगी जेष्ठ नेते प्रकाश रेड्डी भाकप नेते , किसान सभा राज्य अध्यक्ष मधुकर पाटील, जेष्ठ नेते करूणसागर पगारे, शेकाप नेते ऍड दामोदर पागेरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते महादेव खुडे यांनी झेंडा दाखवून वाहन जथ्था रवाना केला.
हुतात्मा स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे पुतळा येथे कॉम्रेड मिलिंद रानडे, विजय दळवी, आत्मराम विसे, मधुकर पाटील, आदींनी हार अर्पण केले. या जथ्य़ास शुभेच्छा देण्यासाठी महादेव खुडे, माकपचे सुनील मालुसरे माकप, राष्ट्र सेवा दलचे नितीन मते, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विराज देवांग, छत्रभारतीचे समाधान बागुल, भारत हितरक्षकचे किरण मोहिते, संदीप पागेरे, मराठा क्रांती मोर्चाचे माधवी पाटील, आपचे योगेश कापसे, गिरीश उगले पाटील, मिलिंद रानडे हे उपस्थितीत होते.
यावेळी प्रकाश रेड्डी यांनी केंद्र सरकार शेतकरी विरोधी कायदे करून अन्याय करीत आहे. कायदे मागे घ्या अन्यथा शेतकरी कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. कॉम्रेड राजू देसले यांनी शेतकरी विरोधी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. प्रस्तावित वीज बिल विधेयक मागे घ्यावे. बाजार समिती वाचल्या पाहिजेत. ३३ शेतकरी शहिद झाले आहेत. तरी केंद्र सरकार विचार करत नाही ३७ वा दिवस आंदोलनचा आहे. किमान मूल्य मिळालेच पाहिजे असे सांगत किसान सभा तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा दिला.
नाशिकहून निघालेला हा जत्था नागपूर येथे ३ जानेवारीला दोन वाजता पोहचेल. येथे अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची जाहीर सभा होणार आहे. कॉम्रेड तुकाराम भस्मे, भाकप राज्य सचिव, नामदेव गावडे किसान सभा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, श्याम काळे आयटक सरचिटणीस, सी. एन. देशमुख, आयटक राज्य अध्यक्ष, आदी शेतकरी कामगार परिवर्तन वादी पक्ष संघटना शुभेच्छा देण्यासाठी संविधान चौकात येणार आहेत. नागपूर येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जथ्था एकत्रित येऊन दिल्लीकडे रवाना होईल. मराठवाडा मधील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे विधवा महिला ही दिल्ली आंदोलन मध्ये येथून दिल्लीकडे ३ जानेवारीला निघणार आहे. या शेतकरी जथ्थात काँ.राजु देसले कार्यध्यक्ष किसान सभा, काँ.प्रकाश रेड्डी किसान सभा नेते , किसान सभा जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे , सरचिटणीस देविदास भोपळे , जिल्हा संघटक विजय दराडे , काँ.सुकदेव केदारे , अँड.दत्तात्रय गांगुर्डे , नामदेव बोराडे, मधुकर मुठाळ , प्रा के एन अहिरे, जगन माळी, विठोबा घुले आहेत.