नाशिक – शहरात वाहतूक पोलिसांऐवजी आजा प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)चे कर्मचारी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. तसेच, वाहनचालकांना दंड करणे हे सुद्धा वाहतूक पोलिसांचे काम नसल्याचे खुद्द पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी नाशिक पोलिसांकडे आहे. याच अंतर्गत वाहतूक पोलिसांद्वारे ही ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जाते. यावेळी वाहनांची कागदपत्रेही ते तपासतात. मात्र, हे काम वाहतूक पोलिसांचे नाही तर आरटीओचे आहे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. त्यामुळे वाहनाचे कागदपत्र, लायसन्स, पियुसी आदींची तपासणी आरटीओच करणार आहे. शहरात यापुढे आरटीओच वाहन तपासणीची मोहिम राबविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.