नवी दिल्ली – बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या महिन्यापासून तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. प्रसिद्ध व्यावसायिक वैभव रेखी यांच्याशी तिने विवाह केला आहे. आता लग्नाला महिना झाल्यावर दिया वैभवसह मालदीवला हनिमूनला गेली आहे.
मिस इंडिया पॅसिफिक राहिलेली दिया हे इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव. त्यामुळेच तिच्या लग्नाच्या चर्चा पण गाजल्या. लग्नातील विविध विधींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आताही मालदीवचे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडत आहेत. यातीलच एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. तो आहे दिया आणि तिच्या सावत्र मुलीचा.
दियासोबत तिची सावत्र मुलगी समायरा देखील मालदीवला गेली आहे. त्यांच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कॉमेंट्स होत आहेत. या फोटोत दियाने पांढऱ्या ड्रेसमध्ये तर समायरा काळ्या प्रिंटेड ड्रेसमध्ये आहे. या फोटोसाठी तिने पती वैभव याला क्रेडिट दिला आहे.
मालदीव येथील अनेक फोटो दियाने शेअर केले आहेत. या फोटोंना तिने सुरेख कॅप्शन दिले आहे. हिंदी महासागर आणि अविश्वसनीय माणसे. येथे आम्ही स्वर्गातच असल्याचे आम्हाला वाटते असून, आम्ही पाहुणचाराचा आनंद घेत आहोत. इथला आमचा प्रत्येक क्षण अगदी आनंदात जातो आहे.