मनाली देवरे, नाशिक
…….
या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची दुर्दशा थांबायला तयार नाही. शनिवारी संध्याकाळी राॕयल चॕलेंजर्स बंगलोर संघाविरुध्दची लढत चेन्नईने ३७ धावांनी गमावली. त्याआधी, दुपारी कोलकाता नाईट रायडर्सने अखेरच्या चेंडूपर्यन्त चित्तथरारक झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंंजाबचा २ धावांनी पराभव करुन त्यांच्यासाठी पहील्या चार संघात येण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
गुरु असलेला धोनी आणि शिष्य असलेला विराट आज समोरासमोर उभे होते. परंतु, या लढतीत शिष्य बाजीगर ठरला आणि गुरु असलेल्या धोनीसाठी मात्र डोकेदुखी वाढवून गेला. चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंंजाब हे विजेतेपदाचे दावेदार मानले जाणारे संघ आपल्या कामगिरीत चांगलेच घसरल्याने त्यांचे चाहते निराश झाले आहेत.
रविवारच्या दोन लढती
रविवारचे दोन्ही सामने मोठे आहेत. पहिला सामना दुबईत दुपारी ३.३० वाजता सनरायझर्स हैद्राबाद वि.राजस्थान राॕयल्स यांच्यात होईल. तर संध्याकाळी ७.३० वाजता अबुधाबीमध्ये सध्याची मोठी फाईट होणार आहे. प्रचंड फाॕर्मात असलेल्या दिल्ली कॕपिटल्सला मुंबई इंडीयन्स संघाशी आता नशिब आजमावून बघावे लागेल. हे दोन्ही संघ पहील्या दोन क्रमांकावर सध्या स्पर्धा करीत आहेत.