दिंडोरी : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेविरोधात दिंडोरी युवासेनेतर्फे उत्तर प्रदेश सरकारच्या कायदा सुव्यवस्था विरोधात निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या व हत्याकांड घटनेच्या निषेधार्थ व संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी अशा मागण्या करुन यावेळी निषेधही करण्यात आला.
दिंडोरी तालुका युवासेना व शिवसेनेतर्फे विस्तारक निलेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.यावेळी युपी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार पंकज पवार, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतीश देशमुख. युवासेनेचे जिल्हा अधिकारी आदित्य केळकर, उपजिल्हाधिकारी निलेश शिंदे, जिल्हा संघटक मंगल भास्कर तालुका संघटक अस्मिता जोंधळे, जिल्हा चिटणीस संगम देशमुख नदीम सैयद, तालुका समन्वयेक सुवर्णा चुंबळे, तालुकाधिकारी किरण कावळे पंचायत समिती गटनेते कैलास पाटील, सुनील पवार, रोहित जंगम, आबा जाधव, सुनील जाधव, अविनाश वाघ, किशोर कदम आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते