दिंडोरी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी केली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे आंदोलन करण्यात आले. दिंडोरी शहरात कडकडीत बंद असून भारत बंदला सक्रिय पाठींबा देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे.त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे .अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. जोरदार घोषणा केंद्र सरकारच्या विरोधात देण्यात आल्या.