दिंडोरी : तालुक्यातील आंबेवणीचे शेतकरी विलास देशमुख सकाळी त्यांच्या द्राक्षे बागेत औषधाची फवारणी करीत असतांना त्यांची नजर एका सापावर गेली. त्यांनी थोडे निरखून बघितल्यानंतर त्याच ठिकाणी गवतात मुंगुस लपुन बसलेला त्यांना दिसला. येथे नागाची व मुंगसाची झुंज चालु असल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने वरखेडा गावचे सर्पमित्र दिपक धामोडे यांना दिली. सर्पमित्रही वेळ न दवडता घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी विषारी जातीचा नाग हा पूर्ण पणे रक्ताने माखलेले आढळला. त्यानंतर देशमुख व सर्पमित्राने या नागाला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. पण दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने दवाखाने बंद होते. ना इलाजाने “फॅमिली डॉक्टर अत्तार वरखेडा” यांच्या कडून उपचार केला व त्या नागास सुखरूप जंगलात सोडले.
दुर्मिळ गव्हानी घुबडासही जीवनदान
तर दुस-या घटनेत दिंडोरीचे फोटो ग्राॅफर शैलेश खंदारे यांच्या फोटो स्टुडिओमध्ये दुर्मिळ गव्हानी घुबड कावळ्यांच्या हल्ल्या मुळे शिरले होते. वरखेड्याचे सर्पमित्र दिपक धामोडे व अभिजीत राजगुरू यांच्याशी त्यांनी संपर्क केला. पूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र त्या ठिकाणी आले. त्यांनी व्यवस्थित पकडून गव्हानी घुबडाला जंगलात सोडले.