गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिंडोरी : समर्थ सेवा मार्गाचा जागतिक कृषी महोत्सव सप्ताह २२ जानेवारीपासून ११०० ठिकाणी

by India Darpan
जानेवारी 15, 2021 | 3:29 am
in स्थानिक बातम्या
0
swami samarth

महाराष्ट्र, परराज्य व परदेशासह तब्बल ११०० ठिकाणी होणार यंदाचा कृषी महोत्सव 
दिंडोरी : श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी, कृषिशास्त्र विभागांतर्गत आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून २२ ते २८ जानेवारी दरम्यान १० व्या जागतिक कृषी महोत्सव सप्ताहाचे आयोजान संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्य व परदेशात देखील करण्यात आले आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वप्रकारचे नियम पाळून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच छोटेखानी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी नाशिक येथे आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक कृषीमहोत्सवमध्ये लाखो शेतकऱ्यांची उपस्थिती व सहभाग असल्याने यंदाच्या कृषी महोत्सवामध्ये गर्दी टाळण्यासाठी, परदेशासह, परराज्य आणि महाराष्ट्रात सुमारे ११०० ठिकाणी या कृषी महोत्सव सप्ताहाचे अतिशय शिस्तबद्ध आयोजन करण्यात येत आहे.
देशात प्रथमच होणाऱ्या या अनोख्या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कमी पाण्यावरील व कमी खर्चातील शेती, घरगुती खते-औषधे बनविण्याचे प्रशिक्षण, शेतीपूरक जोडधंदे, देशी गायींचे संवर्धन व पशुपालन, शेतीतून स्वयंरोजगार, शेतीसाठी योग्य बाजारपेठ, याबरोबरच विविध कृषीतज्ञांचे चर्चासत्र Dindori Pranit Seva Marg या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे तसेच  शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी ऑनलाईन वधू – वर परिचय मेळावे देखील आयोजित केले असल्याची माहिती जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी दिली.
जागतिक कृषी महोत्सव सप्ताह पूर्वतयारी:
जागतिक कृषीमहोत्सव सप्ताहामध्ये गावपातळीवर होणारे सर्व कार्यक्रमांचे नियोजन एकदिवसीय स्वरूपाचे असणार आहे. मागील तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन जागतिक कृषी महोत्सवाचे नियोजन सुरु आहे. कृषी विषयक विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या तज्ञांच्या भेटी घेऊन चर्चा सत्रांचे नियोजन केले जात आहे. जागतिक कृषी महोत्सवाच्या नियोजनासाठी महाराष्ट्रातील हजारो तरुण युवक स्वयंप्रेरणेने दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.
याठिकाणी होणार कृषीमहोत्सव:
परदेशात: जपान, फिनलँड, कॅनडा, नेपाळ या  ठिकाणी व परराज्यात: मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान-, छत्तिसगढ, गुडगाव, हरियाणा, कर्नाटक व गोवा, महाराष्ट्रात तालुका-जिल्हा निहाय विविध ठिकाणी गाव-पातळीवर कमी-अधिक संख्येने सुमारे ९०० पेक्षाही अधिक ठिकाणी होणार.
वेबसाईटवर, अॅप व यूट्यूब चॅनलवरही माहिती
एकदिवसीय जागतिक कृषीमहोत्सवाचे वेळापत्रक तसेच या सप्ताहात होणाऱ्या विविध तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्रांबाबत विस्तृत माहिती www.krushimahotsav.org या वेबसाईटवर किंवा Krushi Mahotsav या अॅपवर उपलब्ध आहे.
तसेच जागतिक कृषीमहोत्सव सप्ताह दरम्यान होणाऱ्या विविध मार्गदर्शन व चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी Dindori Pranit Seva Marg या यु ट्यूब चॅनेलला भेट देऊन सबस्क्राईब करा.
थेट बांधावर होणाऱ्या कृषीमहोत्सवाचे स्वरूप खालील प्रमाणे : 
कोरोनाच्या संदर्भातील अडचणी लक्षात घेऊन सोशल डीस्टन्स ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, योग्य प्रकारे सॅनीटायझरचा वापर करणे अशी सर्वप्रकारची काळजी घेऊनच जागतिक कृषीमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१०ते १५ गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही एका शेताच्या बांधावर कृषी महोत्सवातील शक्य असणाऱ्या उपक्रमांचे सकाळी १० ते ५ पर्यंत आयोजन केले आहे.
वधू-वर परिचय मेळाव्यांचे ऑनलाईन नियोजन
ज्या शेतकरी बांधवांना या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्यांच्या जवळपासच्या कृषीमहोत्सवात सहभाग नोंदवावा
स्थानिक ठिकाणी होणाऱ्या पिकांनुसार व शेतीस आवश्यक साहित्य निहाय कंपन्यांना देखील विविध ठिकाणी सहभाग घेता येईलएकदिवसीय कृषी महोत्सवामुळे दिवसभरात शेतकरी सोयीच्या वेळेनुसार सहभाग घेणार तसेच कृषीतज्ञांचे चर्चासत्र व शेतकरी वधू-वर परिचय मेळाव्यांचे ऑनलाईन नियोजन केल्याने गर्दी देखील होणार नाही
विविध विषयांवर ऑनलाईन विचारमंथन 
दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी व इतर नामांकित कंपन्यांनासह  कृषीमार्ट अंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होत असल्याने प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या कृषी महोत्सवात कृषीमार्टचे प्रतिनिधींकडे शेतकऱ्यांनी नाव-नोंदणी करणे
या सप्ताह कालवधीत देशी बि-बियाणे,पर्यावरण,दुग्धव्यवसाय,गौसंवर्धन,कृषी शेतीतील प्रक्रिया उद्योग,जोडधंदे अशा विविध विषयांवर ऑनलाईन विचारमंथन
स्वयंरोजगार प्रतिनिधींकडे नाव – नोंदणी
शेतकऱ्यांच्या मुला – मुलींसाठी सुयोग स्थळे ऑनलाइन शेतकरी वधू – वर परीचय मेळ्याव्यात उपलब्ध होणार
 समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना योग्य व्यावसायभिमुख  मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार प्रतिनिधींकडे नाव – नोंदणी करण्यात येईल
IMG 20210114 152931 scaled
कृषीमाऊली सत्कार:
 या महोत्सवात देखील नैसर्गिक शेती,देशी बियाणे,गोसेवा, गोसंवर्धन,दुग्धव्यवसाय,कृषी जोड व्यवसाय,विविध माध्यमांमधून शेतकरी विकासाचे लिखाण, कृषी शासकीय सेवा अशा विविध विषयांमध्ये आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थांचा कृषीमाऊली सत्कार देवून गौरव करण्यात येणार असल्याचेही श्री.आबासाहेब मोरे यांनी सांगितले.
कृषी तज्ञांचे Online चर्चासत्र :
Dindori Pranit Seva Marg या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमांतून प्रदर्शित होणारे मार्गदर्शन व्हिडीओ:
२२ जाने. – मा.श्री.सुभाष शर्मा                    – नैसर्गिक शेतीतून स्वावलंबी शेतकरी      –  ११ ते १२
२३ जाने. – मा. श्री. ताराचंद बेलजी              – भाजीपाल्यातून आर्थिक समृद्धी            –   ११ ते १२
२४ जाने. – मा.श्री.गोपालभाई सुतरीया           – भारतीय गाईंचे संवर्धन व संगोपन         – ११ ते १२
              मा.डॉ. सुधीरजी राजूरकर           – भारतीय गाईंचे संवर्धन व संगोपन         –  ०५ ते ०६
२५ जाने. – प्रा.रजनीताई जोशी                   –  अध्यात्मिक /प्राचीन शेती                 –  ११ ते १२
२६ जाने. – मा.श्री.विलासजी शिंदे                 – कृषी जोड व प्रक्रिया उद्योग              –  ११ ते १२
             मा.श्री.अमितजी मखरे                 –कृषी जोड व प्रक्रिया उद्योग               – ०५ ते ०६
२७ जाने. – मा.श्री. संदीपजी चव्हाण              – विषमुक्त परसबाग                        –  ११ ते १२
२८ जाने.- पद्मश्री.राहीबाई पोपेरे                  –  देशी बीज संवर्धन                         – ११ ते १२
             श्री.संजयजी पाटील                    – देशी बीज संवर्धन                         – ०५ ते ०६
रोज संध्याकाळी ५ ते ६ या दरम्यान वेबिनारद्वारा विविध चर्चासत्र व शंका-समाधान होणार असून Krushi Mahotsav या अॅपद्वारे शेतकऱ्यांना त्याची लिंक प्राप्त करता येईल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जम्मू काश्मिर येथे गेलेल्या भक्तांच्या बँक खात्यावर सायबर चोरटयांचा डल्ला

Next Post

आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १५ जानेवारी २०२१

India Darpan

Next Post

आजचे राशीभविष्य - शुक्रवार - १५ जानेवारी २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011